देश

सात राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती, राष्ट्रपतींची घोषणा

नवी दिल्ली | देशातील सात राज्यांमध्ये नव्या राज्यपालाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात जम्मू काश्मीर, बिहार, हरियाणा, त्रिपुरा, सिक्कीम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या सात राज्यांमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये एन. एन. व्होरांच्या जागी सत्यपाल मलिक, बिहारच्या राज्यपालपदी उत्तर प्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बिहारचे भाजपचे नेते सत्यदेव नारायण आर्य यांना हरियाणाचे राज्यपाल,  हरयाणाचे विद्यमान राज्यपाल कप्तानसिंह सोळंकी हे त्रिपुराचे राज्यपाल, त्रिपुराचे विद्यमान राज्यपाल तथागत रॉय यांना मेघालयचं राज्यपालपद दिलंय.

मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यांची सिक्कीमचे राज्यपाल, उत्तराखंडाचे राज्यपाल के के पॉल त्यांच्या जागी  बेबी रानी मोर्य यांच्याकडे राज्यपालाची धूरा सोपवण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या-

-परेलमधील क्रिस्टल टॉवरच्या आगीत 16 जण जखमी तर चौघांचा दुर्दैवी अंत

-भाजपच्या राज्यात राम मंदिराचा फुटबॉल झालाय- शिवसेना

-परेलमधील क्रिस्टल टॉवरला आग; पाहा काय काय घडतंय…

-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत काळाच्या पडद्याआड

-पप्पा, चांगले आहेत की वाईट?; धोनीच्या मुलीचं उत्तर सोशल मीडियात व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या