‘तुम्ही कुटुंबीयांनी बसून लाडू, चकल्या खायच्या अन्… ‘; राऊतांचा पवारांना टोला

मुंबई | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) गेले काही दिवस आजारी असल्यामुळे ते सध्या कोणत्याच कार्यक्रमला उपस्थित राहत नाहीत. मागील काही दिवस अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्यानं त्यांना थोडे दिवस डाॅक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितलं आहे.

अजित पवारांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलत असताना राऊत म्हणाले की, अजित पवार डेंग्यूमुळे आजारी असताना, त्यांच्या अंगात अशक्तपणा असूनही त्यांना अंथरुणातून उठून दिल्लीला अमित शहा यांच्या भेटीला जावं लागलं. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

पुढं ते म्हणाले की, “हे म्हणजे मराठ्यांनी स्वाभिमान गहाण ठेवून दिल्लीचे चरणदास होण्यासारखं आहे.अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना भेटू शकत नाहीत. त्यांना थकवा आलाय, शरीर कमजोर झाले आहे.”

दिवाळीत आपण कार्यकर्त्यांना भेटणार नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं होतं. आपल्याकडे पद्धत आहे की, आजारी व्यक्तीला इतर लोक भेटायला येतात. पण इथे शरीराने आणि मनाने आजारी असलेल्या माणसाला दिल्लीत जाऊन त्याच्या नव्या नेत्यांना भेटावं लागतं ही अत्यंत दुर्दैवीच गोष्ट आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

त्यानंतर राऊत यांनी अमित शाहांवर सुद्धा निशाणा धरला. ते म्हणाले की, खरंतर अमित शहा यांनी त्यांना भेटायला आलं पाहिजे. आपण शरद पवार यांच्या घरातून फोडलेला एवढा मोठा नेता, ज्याच्याकडे 40 आमदारांचं पाठबळ असल्याचं सांगितलं जातं. त्या नेत्याला भेटायला अमित शहा नक्कीच येऊ शकतात. पण आजारी माणसाला अंथरुणातून उठून दिल्ली जावं लागलं, असं राऊतांनी म्हटलं. यावेळी बोलताना राऊतांनी शरद पवारांवर देखील टीका केली.

आपण कुटुंबीयांनी एकत्र बसून लाडू, चकल्या खायचे. पण कार्यकर्त्यांनी लढायचं, असं चालत नाही. हे माझं मत आहे. हेच उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचही मत असेल. या भेटीगाठींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. ही गोष्ट नेतृत्त्वाच्या लक्षात येत असेल, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

थोडक्यात बातम्या –

‘त्या भेटीत अनेक…’; अपक्ष आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

पोलीस कोठडीत ललित पाटील याची प्रकृती बिघडली!

“उद्धव ठाकरेंना अडवताय, तुमची लायकी काय?”

पुन्हा जोरदार पाऊस कोसळणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर… काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप