‘या’ धमाकेदार फीचर्समुळं इंस्टाग्राम वापरणं झालं आणखी मजेशीर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | इंस्टाग्राम वापरकर्त्यांची(Instagram Users) संख्या असंख्य आहे. आजकाल कोणाच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम नाही, असं सहसा दिसत नाही. इंस्टाग्राम वापरणं हे अनेकांच्या दैनंदिक जीवनातला एक भाग झाला आहे. त्यातच इंस्टाग्रामनं काही नवीन फीचर्स(Instagram New Features) आणले आहेत. त्यामुळं इंस्टाग्राम वापरणं आणखी मजेशीर झालं आहे.

इंस्टाग्रामच्या स्टेटसचे शाॅर्ट फाॅरमॅट या फीचर्सद्वारे तुम्हाला इमोजीसह साठ शंब्दांपर्यंतची शाॅर्ट स्टोरी पोस्ट करता येईल. या फिचर्सचा वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे.

ग्रुप प्रोफाईल हे सुद्धा इंस्टाग्रामचे भन्नाट फीचर आहे. याद्वारे तुम्ही एका विशिष्ट मित्रांच्या किंवा कुटुंबासाठी एक स्वतंत्र प्रोफाइल तयार करू शकता. यासाठी तुम्हाला प्लस बटणावर क्लिक करून ग्रुप प्रोफाइल हा ऑप्शन निवडावा लागेल.

कंटेंट शेड्यूलिंग टूल या फीचरचाही वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे. हे फीचर खास बिजनेस अकाउंटसाठी जारी केले आहे. या फिचरचा वापर करून तुम्ही फोटो-व्हिडीओ तसेच कॅरोसेल पोस्ट हे तब्बल 75 दिवसांसाठी शेड्यूल करू शकता. याकरिता यूजर्सला सेटींग्जमध्ये जाऊन शेड्यूलिंग टूलचा पर्याय चालू करावा लागेल.

कॅंडिड स्टोरी या इंस्टाग्राम फीचर्सची सध्या टेस्ट सुरू आहे. यामध्ये वापरकर्त्यांना नोटिफिकेशनवर क्लिक करून फोटो अपलोड करावा लागेल.

दरम्यान, असे अनेक खास फिचर्स इंस्टाग्रामवर येत आहेत. त्यामुळं इंस्टाग्राम वापरणं आणखी सोप आणि मजेशीर होत आहे. त्यामुळं तुम्हीही नवीन फिचर आले की इंस्टाग्राम अपडेट करून घेऊ शकता.

महत्वाच्या बातम्या-