मुंबई | प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्मानं(Tunisha Sharma) शूटींगदरम्यान सेटवरच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं कलाक्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.
टुनिशाचं नायगाव येथे शूटिंग सुरू होते. सेटवर असलेल्या मेकअप रूममध्ये तिनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.
मेकअप रूममधून टुनिशा खूप वेळ बाहेर न आल्यानं तिच्या सहकाऱ्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, अशी माहिती समोर आली आहे.
सेटवरील लोकांनी तिला दवाखान्यातही नेलं होतं. परंतु डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केलं. टुनिशानं मालिकेच्या सेटवर आत्महत्या केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. परंतु तिच्या आत्महत्येच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, टुनिशाच वय अवघं 20 वर्षे होतं. तिनं आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं तिनं सर्वांची मनं जिंकली होती.
महत्वाच्या बातम्या-
- बाॅलिवूडमध्ये येण्यापूर्वी रणवीर सिंह करायचा चक्क ‘हे’ काम
- अजित पवारांवर शरद पवार नाराज?, अजित पवारांनी सोडलं मौन
- “शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक, पक्ष तोडून हे सत्तेत आलेत”
- बिग बाॅस विजेत्याला मिळणार तब्बल ‘इतके’ रूपये
- ‘माझे कार्यक्रम होत राहतील मी ते बंद करणार नाही’, गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका