धक्काबुक्की का झाली?; महेंद्र थोरवेंनी सांगितलं खरं कारण

मुंबई | शिंदे गटाचे मंत्री दादा भूसे (Dada Bhuse) आणि त्यांच्याच गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात विधानसभेमध्ये धक्काबुक्की झाली. ही धक्काबुक्की इतकी झाली की त्यामध्ये भरत गोगावले आणि मंत्री शंभूराज देसाई यांना मध्यस्थी करावी लागली. दोघांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबला. आता यावर महेंद्र थोरवेंनी प्रतिक्रिया देत नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.

महेंद्र थोरवेंनी सांगितलं नेमकं काय घडलं?

असा वाद झालाच नाही, असा दावा करणाऱ्या शंभूराज देसाई यांना तोंडावर पाडत आमदार महेंद्र थोरवे यांनी (Mahendra Thorve on Dada Bhuse) दादा भूसेंवर सडकून टीका केली आहे.

बाळासाहेबांनी शिकवलं आहे, तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात मारून न्याय मिळवा. दादा भुसे एकदम नकारात्मक मंत्री आहे. माझ्या मतदारसंघातलं काम होत नाही हे विचारलं तर माझ्यावर आवाज चढवला. या कामासाठी मुख्यमंत्री तसेच श्रीकांत शिंदेंनी फोन केला होता. आमदारांची कामं होत नसतील तर काय करणार?, असा सवाल थोरवेंनी केलाय.

आमदार भरत गोगावले असतील मी स्वतः असेल, आम्ही कामाचा पाठपुरावा करत आहोत. माझ्या मतदारसंघातील कामाबाबत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादा भुसे यांना कॉल करून सांगितलेलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितलं की काम करून घ्या. परंतु दादा भुसेंनी सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक काम केलं नाही, असं थोरवेंनी सांगितलं.

“दादा भुसे माझ्यावर चिडून बोलले”

मी त्यांना विचारायला गेलो, तर दादा भुसे माझ्यावर चिडून बोलले. मी विचार केला आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिकपणे आहोत, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदार दिली आहे मंत्री म्हणून, त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत, असंही थोरवे म्हणालेत.

मी काही तुमच्या घरी खायला येत नाही. तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे ते जनतेचे काम आहे. मला त्या ठिकाणी काम झालं पाहिजे, असं महेंद्र थोरवेंनी माध्यमांना सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

अल्पवयीन मुलीसोबत घडला भयानक प्रकार, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

सलमानमुळे घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाचा ऐश्वर्याला आजही होतोय पश्चाताप!

“मोदी-शहा देश चालवायच्या लायकीचे नाहीत…”; ‘हा’ नेता भडकला

मोठी बातमी! संभाजी भिडे थोडक्यात वाचले, धक्कादायक माहिती समोर