Samsung ला टक्कर देण्यासाठी oppo चा पहिला फ्लिप फोन लाॅन्च

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | सध्या बाजारात वेगवेगळ्या फोनची क्रेझ आहे. लवकरच Oppo चा जबरदस्त फोन आता बाजारात येणार आहे. तुम्हाला फोल्ड करणारा फोन आवडत असल्यास तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फोल्डेड अर्थात फ्लिप (Flip) फोन स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आतापर्यंत सर्वात यशस्वी ठरला आहे.

Oppo कंपनीचा Find N2 हा फ्लिप फोन 15 फेब्रुवारीला (February) लाॅन्च होणार आहे. चीनच्या(Chin) बाहेर अधिकृतपणे लाॅन्च होणारा हा पहिला Oppo फोल्डेबल फोन आहे. Samsung K Galaxy Z आणि Flip4 Motorola K च्या फोनला हा Oppo Find N2 फ्लिप फोन टक्कर देऊ शकतो.

कंपनीने अद्दाप फोनची अधिकृत किंमत जाहीर केली नाही आहे. या फोनमध्ये 8GB रॅम आहेत. स्टोरेज बद्दल बोलायचं झाल्यास फोन स्टोरेज 256GB असणार आहे. 8GBरॅम आणि 256GB स्टोरेज असणाऱ्या या फोनची अंदाजे किंमत 1,07,000 असू शकते. हा फोन एस्ट्रल ब्लॅक (Astral Black) आणि मूनलिट पर्पल (Moonlit Purple) रंगात उपलब्ध होईल.

कंपनीनं त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर (YouTube channel) फोनच्या व्हिडिओ शेअर केला आहे. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित असेल. 6.8 इंचीचा डिस्प्ले (Display) जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. 3.68 इंचचा कव्हर डिस्प्ले मिळेल. हा फोल्डडेबल फोन MediaTak Dimensity 9000 plus प्रोसेसरसह आणि 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज सह उपलब्ध होईल

फोनमधील कॅमेरा फंक्शन महत्त्वाचं असतं. यामध्ये तुम्हला 50 मेगापिक्सल (MP) कॅमेरा सेटअप मिळेल. सेल्फी आणि व्डिडिओ काॅलिंगसाठी 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 32 मेगापिक्सेल कॅमेरा मिळणार आहे. हा फोन 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोनमध्ये 4300mAh ची बॅटरी असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या