“गरबा खेळायला फक्त हिंदू धर्मीयांनाच प्रवेश द्यावा”

नागपूर | नवरात्री उत्सव काही दिवसांवर आला आहे. 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये काही तरुण तरुणींनी दांडिया, गरबासाठीची तयारी सुरु केली आहे. राज्यातील काही ठिकाणी दांडिया आणि गरबासाठी पास उपलब्ध देखील असतात.

नवरात्र म्हटलं की ठिकठिकाणी रास गरब्याचं आयोजन केलं जातं. लहाणांपासून, तरूण, मोठ्यापर्यंत अनेक जण यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. दरम्यान आता यावेळेस विश्व हिंदू परिषदेने एक आवाहन केलं आहे, ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

विश्व हिंदू परिषदेने केलेलं ते आवाहन कोणतं?

रास गरबा खेळायला येणाऱ्या व्यक्तीला मुख्य प्रवेशद्वारावर उभं राहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड तपासावं, त्या व्यक्तीला टिळा लावावा, त्यांच्या हातावर धागा बांधावा. त्यांना गोअर्क प्यायला द्यावा, असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलं आहे. त्यांनी या मागचं कारण देखील त्यांनी सांगितलं.

विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गोविंद शेंडे म्हणाले, की दांडिया किंवा रास गरबा हा काय नृत्याचा कार्यक्रम किंवा ऑर्केस्ट्रा नव्हे. ज्या लोकांना देवीप्रती, श्रद्धा नाही, विश्वास नाही असे अनेक लोक गरब्याला येतात. हा देवीला प्रसन्न करण्याचा उत्सव आहे. त्यामुळे गरबा आयोजक आणि प्रशासन या दोघांनीही गरबा केंद्रावर लोकांच्या प्रवेशासाठी उपाययोजना करावी.

थोडक्यात बातम्या-

‘आधी आपली पिलावळ सांभाळा’, गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंना इशारा

ललित पाटीलचं नाशिक कनेक्शन, अत्यंत धक्कादायक माहिती समोर

अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांवर मोठी जबाबदारी?

“100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण ठेवला”

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट समोर!