आली रे आली आता उडणारी बाईक आली!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | तंत्रज्ञान सध्या खूप पुढ गेलं आहे. पेट्रोलचे दर वाढल्यानंतर त्याला पर्याय म्हणून ई-बाईक (E-bike) बाजारात आल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा एक नवीन आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे.

अनेक प्रयत्न करुनही ट्रॅफिकचा (Traffic) प्रश्न काही सुटला नाही. त्यामुळेच आता याला पर्याय म्हणून हवेत उडणाऱ्या गाड्या आल्या आहेत. आता या बाईक्स रस्त्यावर नाही तर आकाशात उडताना दिसणार आहेत.

अमेरिकन एव्हिएशन कंपनी जेटपॅॅकने (Aviation Company Jetpack) हवेत उडणाऱ्या बाईकचं बुकींग सुरु केलं आहे. हवेत उडणारी ही बाईक 250mph वेगाने उडण्यास सक्षम आहे. 2 ते 3 वर्षात ही बाईक बाजारात येण्याची शक्यता आहे.

मुंबईचं (Mumbai) ट्रॅफीक सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे तुम्ही जर मुंबईहून लोणावळ्याला जाण्याचा विचार करत असाल तर ही बाईक एक चांगला पर्याय आहे. 83 किलोमीटर लांब असलेल्या लोणावळ्याला तुम्ही या बाईकने 30 मिनिटात पोहचू शकता.

या बाईकमध्ये 30 मिनिटांत 96 किलोमीटरचा प्रवास करण्याची क्षमता आहे. या बाईकमध्ये चारही कोपऱ्यांवर दोन जेट इंजिन वापरला जाणार आहेत. या बाईकमध्ये व्हिडीओ गेमसारखी (Video game) कंट्रोल सिस्टीम असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या