‘सत्तेसाठी वाट्टेल ते सहन करणार नाही’; आव्हाडांचा प्रकाश आंबेडकरांना गंभीर इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राज्याच्या राजकारणात नवं समीकरण जुळलं असून ठाकरे गट (Thackeray Faction) आणि वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) युती केली आहे. मात्र प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचा भाग आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र अशात प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याने राष्ट्रवादी आणि वंचितमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य करत शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत, असं वक्तव्य केलंय. यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रकाश आंबेडकरांना गंभीर इशारा दिला आहे.

महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही. तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रियाही जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

दरम्यान, सत्तेसाठी वाट्टेल ते सहन करणार नाही, अशा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-