1 रुपयाच्या शेअरचा मोठा धमाका; गुंतवणूकदार झाले करोडपती

नवी दिल्ली | शेअरमार्केट (Share market) मध्ये रिस्क फार असते कधी लाॅस होईल सांगता येत नाही. यामध्ये चढाउतार नेहमीच ठरलेले असतात. इतकं सगळ असून देखील अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. कारण असे काही शेअर असतात जे अचानक तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देतात.

अशातच कोटक महिंद्राच्या(Kotak Mahindra) शेअरनी गुंतवणूकदारांना भरपूर फायदा मिळवून दिला आहे. कोटकच्या शेअर्संनी 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं आहे. ही एक लाॅग टर्म गुंतवणूक होती. त्यामुळे गुंतवणूकदार आनंदात आहेत.

आकड्यांवर नजर टाकल्यास 2001-02 मध्ये मंहिद्रा स्टाॅकची किंमत सुमारे 1.70 रुपये होती. आता मात्र वीस वर्षानंतर 2022 च्या शेवटच्या महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये (December) या स्टाॅकने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. सध्या हा स्टाॅक 1934 रु परतावा देत आहे.

याचा अर्थ जर तुम्ही वीस वर्षापूर्वी या शेअरमध्ये गुंतणूक केली असती. 1 लाखाच्या किंमतीत दिर्घ काळासाठी जर गुंतवणूक (investment) केली असती तर तुम्हाला आता 11 करोड पेक्षा जास्त परतावा मिळाला असता. यामुळे कोटक महिंद्रा शेअरने दिर्घ काळाच्या गुंतवणूक दारांना करोडपती बनवलं आहे.

या शेअरबद्दल सध्या शेअर मार्केटमध्ये सकारात्मक(positive)परिणाम दिसून येत आहेत. येत्या काळात यामध्ये तेजी वाढणार असून एक्सपर्ट बाय रेटिंग देत आहेत. सोमवारी इतर शेअरमध्ये मंदी दिसत असताना महिंद्राच्या शेअरमध्ये मात्र मोठी चढाओढ सुरु होती.

दरम्यान कोटक महिंद्रा ही एक वित्तीय सेवा (Financial services) समूह आहे. जे बँकिंग, काॅर्पोरेट बँकिंग, गुंतवणूक बँकिंग आणि स्टाॅक ब्रोकिंग ऑफर देते. तसेच मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये कोटक मंहिद्राच्या बँकेच्या नफ्यात 27 % ची नोंद झाली आहे.

थोडक्यात बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More