दिव्या अग्रवाल लवकरच करणार या व्यावसायिकाशी लग्न, 9 महिन्यांपूर्वी झालं होतं ब्रेकअप
मुंबई | दिव्या अग्रवाल(Divya Agarwal) ही आटीटीवर बिग बाॅस(Bigg Boss) विजेती ठरली आहे. या शोमुळं दिव्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यामुळं दिव्याचे असंख्य चाहते आहेत. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत जोडली गेलेली आहे. इंस्टाग्रामवरही तिचे 3 मिलियन फाॅलोअर्स आहेत.
सोमवारी दिव्याने तिचा 30 वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. वाढदिवसानिमित्त तिनं चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला. तिचा वाढदिवस साजरा करत असताना तिच्या एका मित्राने तिला प्रपोज केलं आणि दिव्यानं ते मान्यही केलं.
दिव्याला तिचा मित्र अपूर्व पाडगावकरनं(Apurva Padgaonkar) बर्थडे पार्टी दरम्यान गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. आणि दिव्यानं ते मान्यही केलं आहे. सध्या दिव्या आणि अपूर्वचे पार्टीदरम्यानचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.
दिव्यानंही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोघांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंत अपूर्व आणि दिव्या खुप आनंदी दिसत आहेत. तिनं या फोटोंत अपूर्वनं तिला घातलेली अंगठीही दाखवली आहे. या अंगठीवर बायco असं लिहिलं आहे.
हे पाहून सर्वांना असा प्रश्न पडत असेन की, नक्की अपूर्व आहे तरी कोण. अपूर्व एक व्यापारी आहे. त्याचे मुंबईमध्ये चार रेस्टाॅरंट आहेत. तसेच तो महिलांचे मास्टर क्लास घेतो आणि त्यांना पेटींग काढणं, स्वयंपाक करणं या गोष्टी शिकवतो.
दरम्यान, अपूर्वही सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याचे इंस्टाग्रामवर 59 हजारापेक्षा जास्त फोलोअर्स आहेत. दिव्या-अपूर्वच्या नात्याची खबर लागल्यापासून चाहत्यांचा दोघांवर शुभेच्छांचा पाऊस सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.