‘शरद पवारांनी स्वत: ड्रायव्हर असल्याचं सांगत…’; सुप्रिया सुळेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | कर्नाटकच्या (Karnatak) मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांचा कर्नाटकमध्ये समावेश करावा, अशी मागणी केली आहे. यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शरद पवार आणि एस. एम. जोशी यांच्या लढ्याची आठवण एका फेसबtक पोस्टद्वारे करून दिली आहे. यामध्ये सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) एक जुना किस्सा सांगितला आहे.

कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरु झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला आदरणीय पवार साहेबांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली, असं सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) म्हटलंय.

कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय समितीने घेतला. खुद्द एस एम जोशी यांनी 1986 मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय.

पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांकडे होतं. बेळगावात दाखल होण्यासाठी साहेबांनी एक शक्कल लढवली होती. ते कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली. सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. साहेबांनी स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली. खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवलं. तिघे जण निघाले. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली परंतु त्यांना काहीच कळलं नाही, असं त्यांनी पोस्टमध्ये न्हटलंय.

दरम्यान, साहेबांनी कर्नाटक पोलीसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही. खुद्द एस एम जोशी देखील साहेबांच्या पाठीवर उमेटलेले वळ पाहून हळहळले होते. तो काळच तसा होता, असंही त्या म्हणाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या-