सरकारवर टीका करण्यासाठी मला तुमच्या व्यासपीठाची गरज नाही!

औरंगाबाद | माझ्या भाषणाला तुमच्यापेक्षा दहापट गर्दी जमते. सरकारवर टीका करायला मला तुमच्या व्यासपीठाची गरज नाही, अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदींवर केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

प्रल्हाद मोदींच्या सभेला जेवढी गर्दी झाली होती, त्यापेक्षा दहापट गर्दीसमोर मी भाषण केले आहे. त्यामुळे तुमच्या व्यासपीठावर आलो म्हणून मला लोक ओळखतील असे समजण्याचे काही कारण नाही, असं सत्तार यांनी म्हटलं आहे.

जाहीर सभेत सत्तार यांनी राजकीय भाषण करत मोदी सरकारवर टीका केली होती. त्यावर सत्तार यांना राजकीय भाषण करण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही का?, असं प्रल्हाद मोंदींनी सत्तार यांना म्हटलं होतं.

दरम्यान, प्रल्हाद मोंदींनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर अजुन गैरसमज होऊ नयेत म्हणून सत्तार यांनी व्यासपीठावरून जाण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या-

-विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या वडिलांचं निधन

-सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी काँग्रेसला शाेकसभा सुरु आहे असं वाटत होतं- नरेंद्र मोदी

-आम्ही राम मंदिराचा विषय अजून सोडून दिलेला नाही- उद्धव ठाकरे

-आता कितीही वेळा काढा एटीएममधून पैसे; स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर

-कांदा विकून मोदींना पाठवली होती मनी आॅर्डर; त्याला मिळाला ‘हा’ प्रतिसाद