मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून कामाला लागले आहेत. तसेच अनेक रखडलेली कामे त्यांनी मार्गी लावली. विशेषतः पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळणार नसल्याचं सांगत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने आमचा खूप फायदा झाला आहे. महाराष्ट्राला 18 तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले आहेत, असा टोला माजी मंत्री अब्दुल सत्तर यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावलाय. उद्धव ठाकरेे यांच्या काळात जी काम राहिली होती ती कामं एकनाथ शिंदे करत आहेत. असं वक्तव्य करत मुख्यमत्र्यांच्या कामाचं कौतुक त्यांनी केलंय.
आजही शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. शिंदे राज्यातील प्रमुख नेत्यापैकी एक आहेत. शिंदे हे एक समुद्र असून, छोटे-छोटे नेते या समुद्राला मिळत आहेत. 19-20 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. ज्यांना शिंदेचा काॅल आला त्यांना मंत्रिपद मिळणार, असं भाकितही अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलतना व्यक्त केलं आहे.
यादरम्यान आता मत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे. 19 तारखेला मत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या
केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना झटका; ‘या’ वस्तू महागणार
असंसदीय शब्दांची यादी जाहीर; संसदेत जुमलाजीवी, हुकूमशाही शब्द वापरण्यास बंदी
मोठी बातमी! शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय; वाचा एका क्लिकवर
शिंदे-ठाकरे एकत्र येणार?, बंडखोर आमदाराचं सूचक वक्तव्य
‘फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही’, संजय राऊतांचा घणाघा
Comments are closed.