मनोरंजन

अभिनेता अभिषेक बच्चनला रूग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई |  अभिनेता अभिषेक बच्चनला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतल्या नामांकित नानावटी रूग्णालयात अभिषेकवर उपचार सुरू होते. मात्र उपचारानंतर त्याला आता घरी सोडण्यात आलं आहे.

गेल्या 3 दिवसांपूर्वी अभिषेकला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. कोरोनाची लागण होताच त्याला नानावटी रूग्णालयात दाखल केलं गेलं होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे दुसऱ्याच दिवशी महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

काल बच्चन कुटुंबातल्या ऐश्वर्या आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं आहे. अमिताभ यांच्या पत्नी जया यांचा अहवाल सुदैवाने निगेटीव्ह आला आहे. काल बच्चन यांचा बंगला मुंबई महापालिकेकडून सॅनिटाईज करण्यात आला आहे.

अभिषेक बच्चन याने ट्विट करत सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शक्य असेल तर घरी रहा सेफ रहा असं त्याने ट्विट करून म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यात 21 वर्षीय तरुणाच्या खुनाचा थरार; रस्त्यात गाठून गोळीबार त्यानंतर कोयत्याने सपासप वार

सचिन पायलट यांचा भाजपात प्रवेश, या काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

पुण्याची लॉकडाऊन नियमावली जाहीर, वाचा… काय सुरू, काय बंद?

…नाहीतर काॅंग्रेस सचिन पायलट यांच्यावर कारवाई करणार, राजस्थानच्या राजकारणाला नवं वळण!

रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळंच; हे यांना सुचतं कसं?, धारावीवरून शिवसेनेचा टोला

दोन्ही विरोधी पक्षनेत्यांवर पवारांचा शाब्दिक हल्ला तर विरोधी पक्षाला खास सल्ला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या