अपघात की घातपात?, नेत्यांसोबत चाललंय काय?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | वाहने सावकाश चालवा, पुढे शाळा आहे वाहनाचां वेग मर्यादित करा, पुढे गतिरोधक आहे, अति घाई संकटात नेई, DONT DRINK AND DRIVE हे सगळे बोर्ड किंवा सूचना रस्त्याच्या दुतर्भा किंवा महामार्ग अशा ठिकाणी लावलेले असतात याचं कारण म्हणजे रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून. इतकं असूनदेखील अपघातांच प्रमाण काही कमी होत नाहीयं मात्र काही अपघात असे देखील असतात की ते नक्की अपघात होते का असा मुद्दा उपस्थित होतो.

शिंदे गटातील आमदार योगेश कदम(Yogesh Kadam), भाजप आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे अशा नेत्यांची एकापाठोपाठ अपघातांची मालिका सुरुच आहे. महागड्या गाड्या,रात्रीचीच वेळ, महामार्गावरच झालेले अपघात आणि त्याहुन महत्त्वाचं म्हणजे नेत्याचं अपघात होण्याच प्रमाण का वाढतयं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

14 ऑगस्ट 2022 रोजी शिवसंग्रमाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा अपघात झाला. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.यानंतर मात्र अजूनही नेतेमंडळीचे अपघात कमी होण्याचं काही नाव घेत नाही. त्यामुळे संशय तर व्यक्त केला जातोय मात्र सुरुक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.

या तिन्ही अपघातांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

24 डिसेंबर 2022 रोजी भल्या पहाटे सकाळी साडेतीनच्या सुमारास पुण्याहून दहिवडेकडे जात असताना आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्या गाडीला अपघात झाला. मंगळवारी 4 जानेवारीला राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) घरी जात असताना रात्री 12.30 वाजता अपघात झाला. मुंडेंच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या अपघात चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने झाला असल्याची माहिती मुंडेंनी दिली होती

शिंदे गटातील दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्यादेखील रात्रीच्या सुमारास अपघात झाला. त्यांच्या मतदार संघाचा कार्यक्रम आटोपून ते जात असताता एका टँकरने कदम यांच्या गाडीला धडक दिली. योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा कट उद्धव ठाकरेंनी केला असल्याचा आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. याप्रकाराची चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या सगळ्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील नेत्यांचा जीव धोक्यात आलाय का? की स्टंटबाजीसाठी हे प्रकार केले जातायात? नेमके रात्री किंवा पहाटेच हे अपघात का होतायत? महामार्गावरील रस्त्यावरच का लोक जखमी होतायत?. हे सगळं प्रश्न या अपघातांच्या आजूबाजूला फिरत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर इतक्या महागड्या गाड्या असून आमदारांच्या अपघातांच प्रमाण वाढतंय तर मग सामान्यांची अवस्था काय होतीय हा कधीच न सुटणार गहन प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या