बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

पुणे | मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. पुण्यात आज मंगळवारी पहाटे त्यांचं निधन झाले. दुपारी बारा वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कुलकर्णी यांनी जवळपास 100 मराठी आणि हिंदी चित्रपटांमधे त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या. ‘झपाटलेला, माहेरची साडी, नवरी मिळे नवरयाला, आमच्या सारखे आम्हीच’ अश्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या.

काही दिवसांपूर्वीच जयराम यांनी भूमिका साकारलेला खेळ आयुष्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, इत्यादी चित्रपटातील  त्यांच्या भूमिकां अजरामर ठरल्या.

दरम्यान, सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी जयराम कुलकर्णी यांचा जन्म झाला होता. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता.

ट्रेंडिंग बातम्या-

व्हा लखपती! कोरोनावर उपाय सुचवा आणि जिंका….; नरेंद्र मोदींचं ट्वीट

कोरोनापासून वाचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्कवर शिवरायांचा फोटो; शिवप्रेमींकडून संताप

महत्त्वाच्या बातम्या-

संभाजीराजेंनी माजी लष्करप्रमुखांना सांगितला मराठ्यांचा गौरवशाली इतिहास; त्यावर ते म्हणाले मला तो फोटो द्या!

कोरोना रोखण्यासाठी ठाकरे सरकारने घेतेलले 11 मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर

“चंद्रकांतदादा जरा जपून बोला नाहीतर तुम्हाला तुमची उंची दाखवावी लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More