बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल परबांनंतर शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या अडचणी वाढल्या

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपासून निवडणुका नसतानाही राजकारण चांगलंच तापताना पाहायला मिळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सपाटाच लावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर अंमलबजानणी संचलनालयाचा अद्यापही ससेमिरा कायम आहे.

वाशीम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं कंपनीमध्ये बदल करण्यात आल्या प्रकरणी कंपनीचे संचालक सईद खान अटक करण्यात आली आहे. ईडीकडून ही अटक करण्यात आली आहे.

सईद खान यांना अटक करण्यात आल्यानंतर खान यांची अटक बेकायदेशीर आहे, असं खान यांच्या वकिलांकडून सांगण्यात येत आहे. ईडीकडून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केलं तरी, खान यांना अटक झाली आहे. खान यांना अटक झाल्यानंतर आता भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, ज्या कंपनीच्या चौकशीसाठी ईडीकडून खान यांना अटक करण्यात आली आहे. त्या कंपनीच्या भावना गवळी निर्देशक राहिल्या आहेत. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसात भावना गवळींची देखील ईडीकडून चौकशी होऊ शकते. गवळी यांचं हे दुसरं प्रकरण आहे, ज्यावर ईडी कारवाई करत आहेत.

 

थोडक्यात बातम्या –

21 कोटींची बोली लागलेल्या सुलतानने घेतला अखेरचा श्वास! मालक ‘बनीवाल’ करत होता तब्बल ‘इतका’ खर्च

दिल्लीचा विजयरथ अखेर कोलकाताने रोखला! कोलकाताचा दिल्लीवर धमाकेदार विजय

“जयंत पाटील आले, मात्र एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत”

“पुढची दहा वर्षे धनंजय मुंडेंना कोणीच हरवू शकणार नाही”

“शेतात गुडघाभर पाणी आहे, नुकसान फक्त टक्केवारीत मोजू नका”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More