बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”या’ स्टारकास्टनंतर आता शाहरूखही एनसीबीच्या निशाण्यावर’; सरकारमधील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य!

मुंबई | क्रुझ पार्टीवर टाकलेल्या धाडीवरून राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे उपाध्यक्ष मनिष भानूशाली यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर ड्रग्ज प्रकरणावरून बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप मलिक यांनी केला. त्यामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकांना चौकशीसाठी बोलवत आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती, दीपिका पदूकोण, अर्जून रामपाल किंवा भारती सिंग असेल. किती दिवस या लोकांना बोलवून दिवसभर ते मीडियावर बातम्या चालवणार. बॉलिवूडला बदनाम करण्याचं काम सुरू असून आता पुढचं टार्गेट शाहरूख खान आहे, असा दावा ही नवाब मलिक यांनी केला आहे.

कुणाच्या बोलण्यावरून धाडी सुरू आहेत. लोकांमध्ये कोण भीती निर्माण करत आहे. यासाठी भाजपचे कोणते नेते मध्यस्थी करत आहेत? हे सर्व मी बाहेर काढणार आहे, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, क्रुझवर एनसीबीने धाड टाकल्यावर अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान त्या पार्टीमध्ये आढळून आला. आर्यन खानसह इतर 11 जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंचं तापलेलं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या-

आयकर धाडीनंतर सोमय्या म्हणतात, पवार साहेब जरंडेश्र्वरचा खरा मालक कोण?

शालूकडून नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा, पाहा राजेश्वरी खरातचा गोजीरवाणा अंदाज

आता देवीच्या मंडपात फक्त 5 जणांनाच परवानगी, वाचा सविस्तर

कारखान्यावरील धाडीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आरोग्यमंत्र्यांनी केली नवीन योजनेची घोषणा, काय आहे ‘मिशन कवच कुंडल’?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More