अत्यंत भयंकर प्रकार; सलमानच्या एंट्रीनंतर चाहत्याने केलं असं काही की…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नाशिक | बाॅलिवूडच्या भाईजानचे देशभरात प्रचंड फॅन्स आहेत. 90 चं दशक त्यांनी असं गाजवलं ज्यामुळे त्याच्या अभिनयामुळे त्यांनी प्रत्येकाच्या मनात घर केलं. नेहमी प्रमाणे सलमानने पुुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना वेड लावलं आहे.

सलमान खानचा टायगर थ्री हा चित्रपट नुकताच संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे. टायगर 2 नंतर त्याचे चहाते या चित्रपटाच्या 3 भागाची वाट पाहत होते. अखेर टायगर थ्री हा चित्रपट थिएटरमध्ये आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी तूफान गर्दी केली. दरम्यान सलमानच्या चाहत्यांनी अतिउत्साहात चक्क थिएटरमध्येच फटाके फोडले.

नेमकं काय घडलं?

सलमान खानचा टायगर थ्री सिनेमा (Tiger 3 movie) रिलीज झाला आहे. मालेगावमध्ये (malegaon) शो सुरू असताना सलमानच्या एंट्रीवर चाहत्यांनी चक्क थिएटरमध्ये फटाके फोडले. हा घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मालेगावातील मोहन सिनेमागृहात हा प्रकार घडला आहे. थेट थिएटरमध्ये फटाके फोडत हुल्लडबाजी करण्यात आली आहे. चित्रपटामधील सलमानच्या एंट्रीवर फटाके फोडण्यात आले.

या प्रकारामुळे सिनेमागृहात उपस्थित इतर प्रेक्षकांची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान मालेगावमध्ये चित्रपटगृहात फटाके फोडण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याने या हुल्लडबाज चाहत्यांना आळा घालण्याची मागणी होत आहे.

थो़डक्यात बातम्या- 

एवढा भयानक अपघात कधीच पाहिला नसेल; 100 गाड्या एकमेकांवर धडकल्या

“एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत, नाही तर त्यांची औकात काय?”

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गौतमी पाटीलचा जलवा, ठाणेकरांना म्हणाली… 

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

शरद पवार मराठा की ओबीसी?; पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल