बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लालपरी पुन्हा धावली! तब्बल ‘इतके’ कर्मचारी कामावर परतले

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता जवळजवळ एक महिना होत आला. या आंदोलनावर काही तोडगा निघत नसला तरी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर केली. वेतनवाढीनंतरही कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. पण एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनात आता फूट पडताना दिसत आहे. (ST Employees Strike)

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी गुरूवारी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यासाठी शेवटचं अल्टिमेटम दिलं. कर्मचारी कामावर येण्याची वाट पाहू नाहीतर कारवाई करू असा इशारा परबांनी दिला होता. अनेक कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असताना वेतनवाढीनंतर जवळपास 10 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत.

महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 9 हजार 705 कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. तर 457 एसटी शुक्रवारी रवाना झाल्या आणि 11 हजार 188 प्रवाशांनी शुक्रवारी एसटीतून प्रवास केला आहे. अनेक कर्मचारी कामावर रूजू झाले आणि लालपरी पुन्हा धावायला लागल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, भंडारा वसई येथील आगारातून बस रवाना झाल्या मात्र मुंबई, नाशिक आगारात शांतता पाहायला मिळाली. वेतनवाढीनंतर काही कर्मचारी कामावर रूजू झाले तर अजूनही अनेक कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फुट पडल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत.

थोडक्यात बातम्या-

दिल्लीत नेमकं शिजतंय काय?, चंद्रकांत पाटलांच्या पाठोपाठ फडणवीसही दिल्लीत

सलाम त्यांच्या कार्याला! जीव धोक्यात घालत केलं लसीकरण पूर्ण

“बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार…”, भाजपला खडे बोल

आधी धक्का, मग खळबळ अन् एकनाथ शिंदेंना हसू आवरेना – पाहा व्हिडीओ

“मी आता आई होण्यासाठी जास्त वाट पाहू शकत नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More