बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तळीरामांचे वांदे! लस घेतली तरचं मिळणार दारू; ‘या’ जिल्ह्यात राबवली भन्नाट कल्पना

चेन्नई | कोरोना आटोक्यात येण्यासाठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. त्याचबरोबर कोरोनाचे निर्बंधही सक्तीचे केलेले पहायला मिळत आहे. नागरिकांनी लसीकरण करावं म्हणून अनेक भन्नाट आयडिया वापरल्याचं दिसत असतं. अशातच आता लसीकरण केलं असेल तरच तामिळनाडूतील नीलगिरी जिल्ह्यात दारु मिळणार असल्याचं समोर आलंय.

कोरोना काळात अनेक ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्र सक्ती केली आहे. त्यामुळे लसीकरण केलं असेल तर बऱ्याच ठिकाणी मुभा दिलेली पहायला मिळते. अशातच आता तामिळनाडूतील नीलगिरी जिल्ह्यात दारु घ्यायची असेल तर लसीकरण प्रमाणपत्र सक्तीचं केलं आहे.

तामिळनाडूत सरकारी दारू विक्री केंद्रातून दारू विकत घ्यायची असेल तर आधार कार्ड आणि लसीकरणाचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. तामिळनाडू राज्यात अशी योजना राबवणारा नीलगिरी हा पहिलाच जिल्हा ठरला आहे. 1 सप्टेंबर 2021 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढावं म्हणून ही योजना लागू केल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलंय

दरम्यान, राज्य सरकारची कंपनी तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन अधिकृतपणे दारू विक्रीचं काम करते. या दुकानांतून मिळणारी दारू हवी असेल तर कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवणं गरजेचं करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“तुमचं आमचं स्वप्न पुर्ण करायचंय, 2024 ला राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल”

‘शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज’; हसन मुश्रीफ यांची घोषणा

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! गुलाब चक्रीवादळामुळे ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

“मी खूप नशिबवान, कोरोनामुळे माझा जीव वाचला”

…तर मग कर्णधारची गरजच काय?; KKRच्या ‘त्या’ कृतीवर गौतम गंभीर भडकला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More