बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…असं काहीतरी होणारच होतं, कारण ईडी ही भाजपची प्रेयसी आहे- अमोल मिटकरी

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली आहे. रात्री गिरीश चौधरींची ईडीकडून कसून चौकशी केल्यानंर त्यांना अटक करण्यात आली.

गिरीश चौधरी यांना ईडीने रात्री अटक केल्याचं आज सकाळी जाहीर केलं. यामुळे खडसेंना मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता एकनाथ खडसे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. ईडीने केलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

12 आमदारांचं निलंबन केल्यानंतरची ही भाजपाची प्रतिक्रिया आहे. असं म्हणत अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला. असं काहीतरी होणारच होतं. कारण ईडी ही भाजपची प्रेयसी आहे. त्यांचा विरोधकांना नमवण्यासाठी वापर केला जातो. सीडी आता नाथाभाऊ समोर आणतील, त्याची वाट पाहूयात, असं अमोल मिटकरी म्हणाले.

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता.

थोडक्यात बातम्या- 

दिलीप कुमार यांचं निधन हे आपल्यासाठी एक सांस्कृतिक नुकसान आहे- नरेंद्र मोदी

‘युसूफ खान ते दिलीप कुमार’; वाचा हिंदी सिनेसृष्टीच्या पहिला सुपरस्टारचा प्रवास

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना सर्वात मोठा दणका!

‘फडतूस माणसांबद्दल मी बोलत नाही’; भास्कर जाधवांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर

विधिमंडळातील हे 12 सदस्य उत्कृष्ट संसदपटू, भाषण पुरस्कारांनी सन्मानित!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More