बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मोहित कंबोज खाऊन खाऊन फुगलेत, ट्विट करण्यापेक्षा त्यांनी…’, अमोल मिटकरींची टीका

मुंबई | मोहित कंबोज (Mohit Kamboj) सातत्याने राष्ट्रवादीला (NCP) इशारा देताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वीच त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची चौकशी होणार आहे असा इशारा दिला. आता आपण रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीचा अभ्यास करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यावर राष्ट्रवादी विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari यांनी सडकून टीका केली आहे. मोहित कंबोज खाऊन खाऊन फुगलेत, असं मिटकरी यांनी म्हटलं. मोहित कंबोज हे खाऊन खाऊन फुगलेत. त्यांनी ट्विट करत बसण्यापेक्षा अजितदादांप्रमाणे कुपोषित बालकांच्या गावांमध्ये दौरा करावा. म्हणजे ते कमी होतील. आम्ही ठरवलंय की अशा ट्विटला उत्तर द्यायचं नाही. कारण यामागचे खरे कलाकार कोण हे सर्वांनाच माहितीये, असा टोलाही मिटकरींनी लगावला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली. आता राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याची चौकशी होणार असून पत्रकार परिषद घेऊन त्याची पोलखोल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र आज कंबोज यांच्या टार्गेटवर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार असल्याचे दिसून येतायत.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More