150 रुपयांची ‘ही’ गुंतवणूक, वयाच्या 20 व्या वर्षी तुमच्या मुलाला लखपती बनवेल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | देशातील सगळ्यात मोठी सरकारी कंपनी (Government company) म्हणजे एलआयसी होय. LIC ही अशी एक पाॅलिसी आहे जी तुम्हाला सुरक्षा प्रदान करते. LIC च्या अनेक योजना आहेत. LIC मध्ये प्रत्येक वयोगटासाठी पाॅलिसी असते. आज अशीच एक पाॅलिसी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळं तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करु शकता.

LIC जीवन तरुण पाॅलिसी ही एक नाॅन-लिंक्ड (Non-linked),सहभागी, वैयक्तिक, जीवन विमा बचत योजना आहे. या पाॅलिसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना विमा कंपन्यांकडून सुरक्षा आणि बचत दोन्हीदेखील मिळतं. प्रत्येक पालकांना वाटतं की आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित असावं यासाठीच LIC ची जीवन तरुण पाॅलिसी आहे.

LIC ची जीवन तरुण पाॅलिसी करायची असल्यास तुमच्या मुलाचं वय 90 दिवस ते 12 वर्ष असणं गरजेचं आहे. 12 वर्षापेक्षा जास्त वय असल्यास त्याचा लाभ घेऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या मुलांसाठी रोज 150 रुपये वाचवत असाल तर तरुण पाॅलिसी अंतर्गत तुमचा महिन्याचा प्रिमियम 54,000 हजार होऊ शकतो. याचप्रमाणे 8 वर्षात ही किंंमत 4,32,000 इतकी असेल.

तुमची बोनस गुंतवणूकीची रक्कम 2,47,00 असेल. पाॅलिसीची विमा रक्कम 50,0000 रुपये असेल. लाॅयल्टी बोनस (Loyalty bonus) म्हणून तुम्हाला 97,000 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 8,44,500 रुपये मिळतील. तुमचं मुल 20 वर्षाचं होईपर्यंत त्याच्यासाठी तुमच्याकडं ही रक्कम जमा झालेली असेल.

महत्त्वाच्या बातम्या