लव जिहादचं नाव काढताच राखी भडकली; म्हणाली मी मुसलमान…

मुंबई | अभिनेत्री राखी सावंत(Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येत असते. सध्या राखी तिच्या वैवाहिक जीवनामुळं सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

राखीनं दुसरं लग्न आदिल खानसोबत(Aadil Khan) केलं आहे. परंतु तिचं दुसरं लग्नही धोक्यात असल्याचं चित्र आहे. कारण राखीनं माध्यमांशी बोलताना आदिलचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं आहे.

मंगळवारी राखीनं आदिलवर गंभीर आरोप करत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार जाहीर केली होती. त्यानंतर आदिलची चौकशी होऊन आदिलला अटक करण्यात आले आहे. दुसरं लग्नही अडचणीत आल्यानं राखीवर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या झालेल्या सगळ्या प्रकाराबाबत माध्यमांनी बुधवारी राखीसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी राखीला विचारण्यात आलं की, तूही लव जिहादची शिकार झाली आहे का?, हा प्रश्न ऐकताच राखी एकदम संतापली.

या प्रश्नावर उत्तर देताना राखी म्हणाली, मी स्वत: एक मुसलमान आहे आणि मी इस्लाम कबुल केला आहे. हिंदू-मुसलमानाविषयी काही बोलू नका, असं रागाने म्हणत ती तिथून निघून गेली.

दरम्यान, राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. राखीबाबत झालेल्या प्रकाराबद्दल काहीजण दु:ख व्यक्त करत आहेत. तर काहीजण तिच्यावर टीकाही करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-