महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर; यांना मिळाला पुरस्कार
मंबई | यंदाच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महराष्ट्रभूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर करण्यात आला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.
महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केलं. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली.
दरम्यान, 14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेल्या 30 वर्षापासून निरुपण करत आहेत.
अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या असून, आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही ते करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.