पुणे | भाजपच्या नगरसेवकाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे बँनर्स लावल्याने सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. पिंपरी चिंचवडमधील पिंपळे निलख येथील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी बॅनर्स लावत अजित पवारांचे आभार मानले आहेत.
कामाचे ठेके मिळवण्यासाठी कंत्राटदारांकडून बोगस बँक गँरंटी प्रमाणपत्र देण्यात आल्याचा मुद्दा कामठे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सभेत लावून धरला होता. मात्र, या प्रकरणाचं पुढे काहीही न झाल्याने कामठे यांनी अजित पवारांची भेट घेतली.
तुषार कामठे यांनी अजित पवारांची भेट घेतल्यावर त्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला. यामुळे कामठे यांनी आपण आज दाखवून दिले जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे. भ्रष्टाचार नष्ट झालाच पाहिजे. मग तो भ्रष्टाचारी कोणी का असेना. दादा आपले मनस्वी आभार, असे बॅनर्स शहरात अनेक ठिकाणी लावले आहेत.
दरम्यान,कामठे यांनी अजित पवारांकडे तक्रार केल्यानंतर सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट या कंपनीवर गुन्हा दाखल झाला. यानंतर पिंपरी चिंचवडमधील करदात्याचे 55 कोटी रूपये वाचले आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘आता यापेक्षा जास्त बोलायचं नाही, बस झालं’, राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
‘नाटकातली घोडी अन् नौटंकी थाट’; आढळरावांचा अमोल कोल्हेंना टोला
“होय मी राष्ट्रवादी आहे, मी प्रचंड राष्ट्रवादी आहे, 2024 च्या निवडणुकीनंतर…”
“बाटगा जास्त कोडगा असतो, नारायण राणे हे लाचार नेते”
“संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, सगळी कुंडली बाहेर काढीन”
Comments are closed.