महाराष्ट्र मुंबई

नवाब मलिकांच्या भावाविरोधात पोलिसात तक्रार नोंदवणार; भाजप आक्रमक

मुंबई | अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ आणि नगरसेवक कप्तान मलिक यांचा काही कामगारांना मारहाण करत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.

कप्तान मलिक यांंनी कामगारांना मारहाण करुन चूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. सोमय्या यांनी नवाब मलिक यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे.

कुर्ल्यात रस्त्याचे काम सुरु असताना 4 खाजगी कंपनीचे कामगार पाईपमध्ये वायर टाकण्याचे काम करत होते. यावेळी मलिक त्याठिकाणी आले आणि कामाची परवानगी आहे का अशी विचारणा करत कामगारांना मारहाण केली होती.

दरम्यान, कप्तान मलिक यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ एक महिन्याअगोदरचा असून कामगारांनी किंवा अधिकाऱ्यांनी पालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे पालिकेचा महसूल बुडत होता. त्यामुळे मला हे पाऊल उचलणं भाग पडलं, असं ते म्हणाले .

ट्रेंडिंग बातम्या-

नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांची कामगारांना मारहाण

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या