बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप नेता म्हणतो, 5 कोटी असतील तरच सभापतीसाठी लढा!

नाशिक | महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमध्ये मतभेदाच्या बातम्यांना बांध फुटला आहे. एका नेत्याने 5 कोटी असतील तरच सभापतीसाठी लढा, असं सांगितलं असल्याचंही बोललं जातंय. या सगळ्यामुळे अहमदाबादला सहलीसाठी गेलेल्या सदस्यांमध्येही फूट पडली असल्याचीही मोठी चर्चा आहे.

स्थायी समिती सभापतिपदासाठी निवडणूक लढवण्यासाठी ज्याच्याकडे 5 कोटी रुपये असतील त्यालाच उमेदवारी मिळेल असा थेट प्रस्ताव सदस्यांना दिला असल्यामुळे सदस्य चांगलेच संतापले असल्याचं बोललं जातंय.

उमेदवारी देताना फक्त पैसा एवढीच गुणवत्ता आहे का?, असा सवाल करताना महासभा, स्थायी समिती सभा, विधानसभा, लोकसभा तसेच कोणत्याही पक्षाच्या सहभागी न झालेल्या व्यक्तीला सभापतिपदासाठी उमेदवारी दिली जात असेल तर सर्व तत्वनिष्ठ असल्याची भावना सदस्यांमध्ये निर्माण झाली आहे.

दरम्यान, भाजपशी कोणताही संबंध नसताना माजी मंत्री गिरीष महाजन यांचे हस्तक म्हणून महापालिकेच्या कामात हस्तक्षेप करणारे निलेश बोरा हे भाजपमध्येच केंद्रस्थानी असल्याचा आरोपही केला जातोय.

ट्रेंडिंग बातम्या-

पवारांचा धसका घेऊन मोदींनी ‘तो’ निर्णय घेतला असावा; भाजप आमदाराची टोलेबाजी

विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानं सुनेनं खोटे आरोप केले- विद्या चव्हाण

महत्वाच्या बातम्या-

“मुस्लिम आरक्षणाबाबत महाविकास आघाडीत कोणताही निर्णय झाला नाही”

माझ्यासाठी पहिल्यांदा देश नंतर पक्ष; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

“मोदींनी सोशल मीडिया सोडला तर त्यांचे करोडो फाॅलोवर्स अनाथ होतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More