Budget 2022: सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर – रामनाथ कोविंद
नवी दिल्ली | आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या देशभरात त्याचीच चर्चा पहायला मिळत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणानं या अधिवेेशनाची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी देशाच्या लसीकरणाविषयी सांगितलं.
कोरोना महासाथीच्या संकटामुळे देशाच्या अडचणी वाढल्या आहेत. असं असलं तरी कोरोना महामारीच्या संकटात सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये भारत हा आघाडीवर असल्याचं रामनाथ कोविंद यांनी सांगितलं.
कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. तरुणांच्या लसीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. सरकारने भविष्यातील प्लानही तयार केला आहे. त्यासाठी आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आले असून त्यासाठी 64 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचा देशवासियांना चांगला फायदा होत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची पावले उचलली. एका वर्षात 150 कोटी व्हॅक्सिनचा डोस देण्याचा विक्रम केला. देशातील 90 टक्के ज्येष्ठांना एक डोस मिळालेला आहे. तर 70 टक्के लोकांना दोन डोस मिळाले आहेत, असंही रामनाथ कोविंद यांनी सांगतिलं.
थोडक्यात बातम्या –
Budget 2022: अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाच्या प्रगतीसाठी चर्चा करावी – नरेंद्र मोदी
कोरोना व्हायरसच्या लढाईत आता ‘ही’ लस ठरणार गेमचेंजर
तुमचं वजन वाढतयं का?, वजन कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा
घशात दुखत असेल तर करा ‘हे’ नैसर्गिक उपाय, मिळेल त्वरित आराम
अभिमानास्पद! इस्राएलमधील रस्त्याला देणार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव
Comments are closed.