बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“म्हाडा पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे”

मुंबई | म्हाडा येथील विविध पदांसाठीच्या रविवारी होणार असलेल्या परिक्षा रद्द झाल्या आहेत. अचानकपणे रद्द परिक्षा रद्द झाल्यानं (MHADA Exam Cancelled) विद्यार्थ्यांची मोठी तारंबळ झालेली पहायला मिळाली. काही जण तर परिक्षा केंद्रावरही आलेले पहायला मिळाले. याच गोष्टीवरुन आता राजकीय वर्तुळातही खळबळ सुरु आहे.

म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या परिक्षा होणार नाही, असं ट्विट आव्हांडांनी (Jitendra Awhad)  शनिवारी मध्यारात्री केलं होतं. आता ही परीक्षा थेट जानेवारी 2022 मध्ये घेतली जाणार आहे. यावरुन आता भाजपनं राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavisयांनी माध्यमांशी बोलताना, परीक्षांमध्ये मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून म्हाडा पेपर फुटीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी केली आहे.

दरम्यान, परीक्षा जाहीर करायच्या आणि त्यानंतर पेपरफुटीने त्या रद्द करायच्या, अशाप्रकारचा सातत्याने काळाकारभार चाललेला आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागेही आरोग्य विभागाचे तीन वेळा पेपर रद्द करण्यात आले होते, असं म्हणत फडणवीसांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

चिंताजनक! आता ‘या’ जिल्ह्यात आढळला Omicronचा पहिला रुग्ण

महाराष्ट्र कोरोना अपडेट, जाणून घ्या आजची आकडेवारी

नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, म्हणाले ‘बँक बुडाल्यास ठेवीदारांना…’

‘…हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत’; पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका

हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून घालवा, हिंदूंची सत्ता आणा- राहुल गांधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More