‘या’ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | बंगालच्या उपसागरात मॅन-दौंस चक्रिवादळ निर्माण झालं आहे. या चक्रिवादळाचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. यामुळं पुढच्या तीन दिवसांत महारष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

रविवार ते बुधवारच्या दरम्यान लातून,अहमदनगर,नाशिक,पुणे, सातारा, कोल्हापूर,बीड,उस्मानाबाद या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे(India Meteorological Department) अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. तसेच काही ठिकाणी थोड ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्यात कोकण आणि मुंबई वगळता इतर ठिकाणी रात्री कडाक्याची थंडी पडत आहे. तर दिवसभर उबदारपणा जाणवत आहे.

रविवारी म्हणजेच 11 डिसेंबरला ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सोमवार नंतर कमाल आणि किमान तापमानात वाढ होईल, असंही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, चेन्नईला मुसळधार पाऊस पडू शकतो असं सांगण्यात आलं आहे. तसेच तामिळनाडूमधील 13 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-