महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

इतक्या वर्षांनी शिवसेना नेत्यांना भेटल्यानंतर कसं वाटलं?; भुजबळ म्हणतात…

मुंबई | शिवसेना नेत्यांची अनेक वर्षांनी भेट झाली. एकत्र बसून चर्चा केली. हा योग चांगला होता. शिवसेना नेत्यांना फक्त मीच नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्वच नेते भेटले. आमच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ही बैठक झाली, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळांनी काही वर्षांपुर्वीच शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या या संयुक्त बैठकीनंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपलं मत मांडलं.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळीशिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ आणि नवाब मलिक हे नेते उपस्थित होते.

आमची ही बैठक दोन दिवस सुरु होती. त्यात आम्ही शेतकरी, महिला, रोजगार, अल्पसंख्यांक, ओबीसी, एससी, एसटी अशा समाजातल्या सर्व घटकांसाठी एक कार्यक्रम बनवला आहे. त्यात अजून काही सुधारणा असतील तर आमचे पक्षप्रमुख ते सांगतील. त्याप्रमाणे त्यात काही बदल करू, असंही भुजबळ म्हणाले.

 

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या