बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार राज्यपालांची भेट

मुंबई | मागील 6 वर्षापासून पेटलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं. मराठा आरक्षण कायदा देखील रद्द केला आहे. त्यामुळे आता मराठा समाजात नाराजी आहे. राज्यसरकार यावर पुढील पाऊल उचलत राष्ट्रपतींकडून आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यासोबत राज्यपालांची भेट घेणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि समितीचे इतर सदस्य आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. राज्यपालांना भेटून राज्य सरकारतर्फे निवेदन देण्यात येणार आहे. संध्याकाळी 5 वाजता राजभवनावर ही भेट होणार आहे.

मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारचा नाही. त्यामुळे केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांच्याकडे हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पंतप्रधानांनी 370 कलम रद्द करताना जी संवेदनशीलता दाखवली तशीच संवेदनशीलतेची आता गरज आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या पारड्यात टाकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानं राज्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असं राजकारण रंगलं आहे. मराठा आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपनं केला होता. त्यावर ठाकरे सरकारच्या मंत्र्याकडून अनेक प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांनो विनाकारण बाहेर पडणार असाल तर सावधान; आजपासून निर्बंध आणखी कडक

मासिक पाळीत महिलांना होणारा त्रास पुरूषांनीही अनुभवला, अक्षरशः लोळताना दिसले, पाहा व्हिडीओ

ममता बॅनर्जींची तुलना आहिल्याबाईंसोबत केल्याने भूषणसिंह राजे होळकर आक्रमक, म्हणाले…

‘या’ जिल्ह्यात लसीकरणाच्या रांगेतील नागरिकांचीही अँटिजेन टेस्ट करणार!

मन सुन्न करणारी घटना; कोरोनाबाधित पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीसोबत घडला धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More