बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लपत छपत येत महिलेवर हात उचलण्यात कसला आलाय पुरूषार्थ?- चित्रा वाघ

मुंबई | शिवसेनेकडून राम मंदिर संदर्भात भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडून शिवसेना भवन येथे विरोध प्रदर्शन करण्यात आलं. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथं जमले. यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं चित्र दिसून आलं. यावेळी गोंधळ उडाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आलीय. तर महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

भाजप नेत्यांनी महिला कार्यकर्त्यांसह इतर कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या शिवसैनिकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. तसेच यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर सडकून टीका केलीये.

आंदोलन संपलं..पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अटक केली त्यानंतर लपत छपत येत महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थ? श्री शिवाजी महाराजांचं नाव घेतां…सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा. महाराष्ट्राच्या पुरोगामी सरकारला हा हल्ला मंजूर आहे का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या- 

मनसुख हिरेन प्रकरणात नवं वळण; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचा छापा

“…तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावं लागेल”

…तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल- प्रकाश आंबेडकर

‘…तर लशीचाही फारसा काही उपयोग होणार नाही’; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

“उद्धव ठाकरे मोदींसमोर नाक घासून आलेत, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More