भाजपसाठी धोक्याची घंटा; मध्यप्रदेशमध्ये सत्ता जाणार?

नवी दिल्ली |  अाज तेलंगणा आणि राजस्थान मध्ये मतदान पार पडल्यानंतर पाच राज्यांत कोण सत्तेवर येणार याबाबतचे एक्झिट पोल प्रसिद्ध होत आहेत. मध्यप्रदेश मध्ये भाजपचा पराभव  काँग्रेस सत्तेवर येईल असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलचा आहे.

एबीपी न्यूज-लोकनीतीच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 126 तर भाजपला 94 जागा दाखवण्यात आल्या आहेत.रिपब्लीक-सीवोटरच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 100 ते 126 तर भाजपला 90 ते 106 आणि इतरांना 6 ते 26 जागा  मिळण्याचा अंदाज आहे.

इंडिया टुडे – अॅक्सिस माय इंडिया च्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 104 ते 122 तर भाजपाला 102 ते 120 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, बहुतांश एक्झिट पोल मध्यप्रदेश काँग्रेस विजयी होईल असे दाखवत असले तरी टाइम्स नाऊ-सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार भाजप 126 तर काँग्रेस 89, बसपा 7 आणि इतरांना 8 जागा मिळतील अशी शक्यता आहे.  

महत्वाच्या बातम्या-

-नरेंद्र मोदी तुघलक तर योगी आदित्यनाथ औरंगजेब; काँग्रेसची टीका

-शरद पवारांच्या गाडीचं सारथ्य केलं चक्क त्यांच्या नातीनं

-50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नकोच – सर्वोच्य न्यायालय

-शरद पवारांचा गडकरींना प्रेमाचा सल्ला; म्हणाले तब्येतीला सांभाळा…

धक्कादायक! पोलीस निरीक्षक सुबोधकुमार यांना जवानाने गोळी घातली