बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएलवर कोरोनाचं सावट; आणखी 14 कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

मुंबई | यावर्षीचा आयपीएल हंगाम 4 दिवसांवर येऊन ठेपला असताना यंदाच्या आयपीएलवर कोरोनाचं संकट आणखीनच बळावलं आहे. मुंबईत आयपीएलचे 10 सामने खेळले जाणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल सामने हे वेळापत्रकानुसार आणि वेळेवरच होतील असं सरकारकडून स्पष्ट केलं गेलं आहे. तर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही यावर मोहर लावली आहे.

आयपीएल संबंधित फ्रँचायझी आणि ब्रॉडकास्टिंग युनिटमध्ये कोरोनाच्या शिरकाव झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे संकट आणखीनच वाढले आहे. नितीश राणा आणि अक्षर पटेल या दोन खेळाडूंना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. तर वानखेडे स्टेडियमवरच्या 8 कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

आता थेट प्रसारण करणाऱ्या 14 कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती समोर येत आहे. ब्रॉडकास्टिंग कर्मचाऱ्यांची सोय मुंबईच्या फोर सिझन हॉटेलमध्ये करण्यात आली होती. त्यांना आता हॉटेलमध्येच विलगिकरणात ठेवण्यात आलं आहे. बीसीसीआयने प्रत्येक गृपसाठी बायो बबलची सोय केली आहे. यासाठी बीसीसीआयने 6 बायो बबल केंद्र उभारली आहेत.

दरम्यान,  ब्रॉडकास्टिंग कर्मचाऱ्यांची स्टारसला चिंता आहे. जर मैदानात कर्मचारी आणि आयोजन समितीचे सदस्य कोरोनाग्रस्त होऊ शकतात तर, आमच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोना होऊ शकतो. आम्ही त्यांच्या प्रकृती वर लक्ष ठेवून आहोत असं, बीसीसीआयने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; CBI टीम आज मुंबईत येणार

‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की…’; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश

“महाराष्ट्रातील घाणेरड्या राजकारणामुळे मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला”- संजय राठोड

“फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच राज्यात मिनी लाॅकडाऊन लागू”

सोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More