बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अर्धशतक केलं दीपक हुडाने पण ट्रोल होतोय कृणाल पांड्या

मुंबई | पंजाब किंग्ज आणि राजस्थान राॅयल्समध्ये झालेल्या थरारक सामन्यात अखेर पंजाब किंग्जने बाजी मारली. या सामान्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने धडाकेबाज खेळी करत या आयपीएल हंगामातील पहिलं शतक ठोकलं. पंजाब किंग्ज सामना सहज जिंकेल अशी चिन्हे दिसत असताना संजू सॅमसनने स्वबळावर सामना फिरवला. तर या सामन्यात पंजाबच्या दीपक हुडाने देखील आक्रमक खेळी केली होती. पण त्याच्या या खेळनंतर मुंबई इंडियन्सचा कृणाल पांड्या ट्रोल होताना दिसत आहे.

कृणाल पांड्या आणि दीपक हुडा दोघेही बडोद्याचे खेळाडू आहेत. जानेवारीमध्ये बडोद्याच्या संघ बीसीसीआयची एक स्पर्धा खेळण्यासाठी एकत्र आला होता. त्यावेळी कृणाल पांड्याने सर्वांसमोर दीपक हुडाचा अपमान केला. यावरून कृणाल पांड्यावर बडोदा क्रिकेट बोर्डाने कारवाई करण्याची अपेक्षा केली होती. पण बडोदा क्रिकेट बोर्डाने कृणालवर कारवाई केली नाही आणि तर उलट दीपक हुडावर एक वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दीपकने फॅन्स कृणाल वर नाराज असल्याचं दिसून आलं.

सोमवारी पंजाब आणि राजस्थान मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात दीपक हुडा 4 थ्या स्थानावर खेळायला आला. त्यावेळी पंजाबची धावसंख्या चांगली होती. पण दीपक हुडाने आक्रमक फलंदाजी करत केवळ 28 चेंडूत 64 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार तर 6 गगनचुंबी षटकार मारले. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच दीपकचा रुद्रावतार क्रिकेटप्रमींना पाहायला मिळाला.

दरम्यान, दीपकची खेळी पाहून कर्णधार केएल राहुल देखील रंगात आला. त्यानं देखील दीपकला साथ देत मैदानात षटकार उत्सव साजरा केला. आगामी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जच्या सामन्यात हे दोन खेळाडू आमनेसामने आल्यावर काय होईल याची उत्सुकता क्रिकेटप्रमींमध्ये शिगेला पोहचली आहे.

थोडक्यात बातम्या-

थरारक सामन्यात अखेर पंजाब किंग्ज विजयी; संजू सॅमसनची तुफानी खेळी

पुण्यात कोरोना आटोक्यात?; दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिलासा, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

संभाजी भिडे यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात केलं दाखल

मावळ तालुक्यात पवनानगर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More