बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीतील हिंसाचारामुळे सीबीएसईच्या परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली |  दिल्लीत सुरु असलेल्या हिंसक आंदोलनामुळे दिल्लीतील सीबीएसई दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उत्तर पूर्व दिल्ली भागातल्या 86 केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षार्थींना नवीन तारीख कळवण्यात येणार आहे.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी पासून सुरू झाल्या आहेत. दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, दिल्लीच्या उत्तर पूर्व भागातल्या परीक्षा केंद्रांवर 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

कोणकोणत्या 86 केंद्रांवरील परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत, त्याची यादी सीबीएसईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थी-पालक, शिक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, सीएए, एनआरसी  आणि एनपीआरवरुन आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. दिल्लीत मोठा हिंसाचार पाहायला मिळत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर या

अब की बार बाप-बेटे की सरकार; मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला

महत्वाचा बातम्या-

सावरकरांचं योगदान विसरुन चालणार नाही- अजित पवार

बांगड्या घालण्याच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युतर

शिवसेनेच्या हिंदुत्वाची परिक्षा!; सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More