बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘शंभर टक्के सांगतो ती चूकच होती’

मुंबई | अजित पवारांसोबत सरकार स्थापन केल्याचा पश्चाताप होत नाही. पण असं सरकार स्थापन करायला नको होतं. शंभर टक्के सांगतो. ती चूकच होती, अशी कबुली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते  ‘लोकसत्ता’ला  दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

त्या गोष्टीचा पश्चाताप होत नाही, पण एवढंच सांगतो असं सरकार करायला नको होतं, ही चूक आहे. शंभर टक्के सांगतो ही चूक असली तरी पश्चाताप होत नाही. कारण ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खूपसला जातो त्यावेळी राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी जे जे करावं लागतं ते करावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

पहाटेच्या शपथविधीमुळे आमच्या समर्थकांच्या मनात माझी जी प्रतिमा होती त्या प्रतिमेलाही बऱ्यापैकी तडा गेला, हे मी मान्य करतो. मला वाटतं ते केलं नसतं तर अधिक चांगलं झालं असतं. पण त्यावेळी मला ते अधिक योग्य वाटलं, हे देखील सांगतो, असं फडणवीस म्हणालेत.

दरम्यान, आम्ही कधी शिवसेनेसोबत जाणार तर कधी राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याचं सांगितलं जातं. कधी शिवसेनेचे लोकं आमच्याकडे येणार तर कधी राष्ट्रवादीचे लोकं आमच्याकडे येणार असंही सांगितलं जातं. अशा चर्चा सुरू झाल्याने बरं वाटतं. चर्चेत राहिलं पाहिजे. पण सध्या आमची कुणाशीही कोणतीही चर्चा सुरू नाही. असा कोणताही अजेंडा नाही. सरकार बनविण्याचं असं काही सुरू नाही, असं देवेंद्र फडणीस यांनी स्पष्ट केलंय.

थोडक्यात बातम्या-

राज-उद्धव एकत्र येणार का?; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘मराठा मोर्चा निघणारच’, विनायक मेटे आक्रमक; बीडमध्ये पहिला मोर्चा निघणार

हैराण करणारी बातमी! HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस राहिला कोरोनाचा विषाणू

शिवकालीन ‘होन’च्या साक्षीने साजरा होणार यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा; संभाजीराजेंनी शेअर केला दुर्मिळ फोटो

आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ; डिस्चार्ज मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी रुग्ण पुन्हा कोरोना पाॅझिटिव्ह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More