दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली; नवऱ्यासोबत केलं हादरवणारं कृत्य

जयपूर | जयपूरमध्ये (Jaipur) अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका पत्नीने तिच्या पतीसोबत हादरवणारं कृत्य केलं आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली.

जयपूरमध्ये तीन दिवसांपूर्वी सापडलेल्या एका मृतदेहाबाबत (Body) मोठा खुलासा समोर आलाय. या व्यक्तीचा अपघात (Accident) त्याच्याच पत्नीने घडवून आणल्याचं तपासात समोर आलं आहे.

या तरूणाचा मृत्यू अपघातात झाला नव्हता तर त्याला मुद्दामहून कारने उडवण्यात आलं होतं. हे काम दुसऱ्या कुणाचं नसून त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराचं होतं. त्याची पत्नी पतीच्या मावस भावाच्या प्रेमात वेडी झाली होती.

या दोघांच्या प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीला मार्गातून वेगळं करण्यासाठी दोघांनी मिळून प्लान केला होता. पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. पोलिसांनी हत्येप्रकरणी पत्नी, तिचा दीर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

दरम्यान, पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपींनी गिलधारीलालच्या हत्येचा गुन्हा कबूल केला. चौकशीतून समोर आलं की, आरोपी रमेश मृत गिरधारीलालचा मावस भाऊ आहे. रमेशचं मावस भावाची पत्नी कमला उर्फ पूजासोबत एक वर्षापासून अफेअर सुरू होतं, अशी माहिती समोर आलीये.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More