बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सकाळी ब्रश केल्यानंतर काहीही न खाता गोमूत्र प्या, तुम्हाला कोरोना होणार नाही”

लखनऊ | उत्तर प्रदेशच्या बलियाच्या बैरिया विधानसभेचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी अजब सल्ला दिला आहे. सुरेंद्र सिंह यांनी सर्वांना गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. फक्त सल्लाच नाही तर त्यांनी स्वतःचा गोमूत्र पितानाचा व्हिडीओही देखील शेअर केला आहे.

मी रोज गोमूत्र पितो त्यामुळेच निरोगी आहे, असं आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. सकाळी ब्रश केल्यानंतर काहीही न खाता ठंड पाण्यात 5 झाकण गोमूत्र मिसळून प्यावं आणि यानंतर अर्धा तास काहीच खाऊ नये. असं केल्यास कोरोनाच नाही तर कोणताच आजार तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही, असा अजब दावा सुरेंद्र सिंह यांनी केलाय.

कोरोना महामारीच्या काळात विज्ञानही फेल ठरलं आहे. अशात या गोमूत्रानं मला अजूनही सुरक्षित ठेवलं आहे. दिवसभर बाहेर फिरुन आणि सतत लोकांमध्येही राहूनही दररोज गोमूत्र पिल्यामुळे मला काही झालं नाही, असं सुरेंद्र सिंह यांनी सांगितलंय.

खोकला आणि तापापासून वाचण्यासाठी मी  गायीच्या तुपात हल्दीची पावडर मिसळून ठेवली आहे. जेव्हा मी दौऱ्यावर जातो तेव्हा सगळीकडेच फिल्टरचं पाणी मिळत नाही. कुठेही पाणी पिल्यानंतर हे मिश्रण तोंडात टाकल्यास तुम्ही सुरक्षित राहाल, असा सल्लाही सुरेंद्र सिंह यांनी दिला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन; फक्त या सेवा सुरू राहतील

“नितीन गडकरींकडे जबाबदारी देण्यामागची सुब्रमण्यम स्वामींची तळमळ समजून घ्या”

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक; मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोनाने वडिलांचं निधन; अंत्यसंस्कार करून घरी आल्यानंतर कुटुंबाने उचललं धक्कादायक पाऊल

पदोन्नतीत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More