बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ अटीवरच ईडीने महाराष्ट्रात यावं, नाहीतर येऊ नका – उदयनराजे भोसले

सातारा | राज्यातील अनेक नेत्यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआयकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी सरकार या मुद्यावरून केंद्र सरकारवर सातत्याने आरोप करत आहे. ईडीच्या सातत्याने चालू असणाऱ्या या कारवाईनंतर आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील ईडीसमोर एक अट ठेवली आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले की, मी नेहमी सांगतो ईडीने यावं पण एका अटीवर. कारवाई करणार असाल तर या नाहीतर येऊ नका. नाहीतर पुन्हा याने सांगितलं, त्याने सांगितलं, त्यांचा फोन आला, अशी कारणे देऊ नका. असं असेल तर येऊच नका.

तसेच येणार असाल तर प्रसार माध्यमांना घेऊन या. ईडी जेव्हा कोणती एखादी केस घेते तेव्हा त्याची कारवाई सर्व मीडियासमोर झाली पाहिजे. सर्व कारवाईची माहिती मिळाली पाहिजे, असं देखील उदयनराजे भोसले यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, पोलीस आणि प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा दबाव वाढत आहे. यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. ही गोष्ट लोकशाहीला मारक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेद्वारी देऊन त्यांच्यामार्फत दबाव ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे असंच चालू राहिलं तर जंगलराज येईल, असं देखील उदयनराजेंनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“फडणवीसांच्या काळात कुणी काय केलं ते लवकरच बाहेर काढणार”

…म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटलांना दिली ‘नवरत्न तेलाची बाटली’ गिफ्ट!

“दलित आणि मुस्लिमांची नावे मतदार याद्यांतून गहाळ करण्यात आली आहेत”

“तुम्हालाही माझा अभिमान वाटेन”; आर्यन खानने समीर वानखेडेंना दिलं ‘हे’ वचन

का वाढतोय कॅन्सरचा धोका?, अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More