सांगली | सरकारने दुधाला जाहीर केलेल्या 5 रुपयाच्या दरवाढीच्या निमित्ताने पांढऱ्या दुधातील काळे बोके कोण? हे शेतकऱ्यांना समजेल, असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेतकऱ्यांना जर तुम्ही 28 रूपये भाव दिला नाही तर मी मुख्यमंत्र्यांकडे दुधात 3 रूपये कपात करण्याची मागणी करणार आहे, असा इशाराही त्यांनी दूध संघांना दिलाय.
दरम्यान, सरकारकडे 5 रूपये दरवाढ तुमचा तोटा भरून काढण्यासाठी मागितली आहे की शेतकऱ्यांसाठी मागितली आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा ठोक मोर्चाचं पुढचं आंदोलन ठरलं; 9 ऑगस्टला कोल्हापुरात भव्य मोर्चा
-मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाची माफी मागावी!
-मराठा मोर्चेकऱ्यांसोबत आता विदर्भवादीही मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक
-मराठा आरक्षणासाठी राणे पिता-पुत्र आक्रमक!
-मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात तीव्र संताप