बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ!

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर त्याच्याच खात्यातील आणखी एका पोलीस अधिकाऱ्यानं भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकूण 27 अधिकाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टसह 22 कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलीस दलाचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांच्या तक्रारी नंतर अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर भष्टाचाराचा आरोप केला आहे. परमबीर सिंह हे 2015 ते 2018 याकालावधीत ठाणे पोलीस आयुक्त असताना आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मनमानी कारभार करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप घाडगे यांनी पत्रात केला आहे.

पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावरच नाहीतर त्यांच्या कुटुंबावरही अत्यंत गंभीर आरोप लावले आहेत. परमबीर सिंह यांची पत्नी इंडिया बुल्स कार्यालयात काम करतात. जिथे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याचसोबत परमबीर सिंह यांचा मुलगा रोहन याचा सिंगापूरमध्ये मोठा व्यवसाय असल्याची माहितीही या पत्रातून देण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वी मुंबई पोलीस दलाचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनीही परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीच्या अनुषंगाने परमबीर यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, आता भाजप पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत?”

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली; राहुल गांधींचा थेट डॉक्टरांना फोन

“देशाबाबत कितीही गर्व करत असले तरी, अवैज्ञानिक लोक देशाला बरबाद करू शकतात”

मोठी बातमी! दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक

‘महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करा’; महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More