महाराष्ट्र मुंबई

“काँग्रेस-राष्ट्रवादीचे 50 आमदार भाजपच्या संपर्कात”

मुंबई | काँग्रेस-राष्ट्रवादीचे 50 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

आगामी काळात शरद पवारांकडे एक आकडी संख्या असणारे लोकही राहतात की नाही याकडे त्यांनी पाहावं, असा जोरदार हल्लाबोल महाजनांनी केला आहे.

सध्या बरेच नेते काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजप शिवसेनेत जात आहेत. त्यावर बोलताना भाजप-सेना सत्तेचा गैरवापर करून नेत्यांना आपल्या पक्षात घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला होता.

आपल्या पक्षातून लोक का जातात याचं आत्मपरीक्षण पवारांनी करावं. उगीचच भाजपवर आरोप करू नयेत, असं महाजन म्हणाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शरद पवारांवर विश्वास राहिला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीत ज्यांना भविष्य दिसत नाही. ते लोक पक्ष बदलतात, असंही महाजनांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“लोकसभा तो सिर्फ झाँकी थी, विधानसभा की पुरी पिक्चर अभी बाकी हैं”

-शरद पवारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणतात…

-‘हा’ माजी आमदार म्हणतो… मी शिवसेनेकडून निवडणूक लढवणारच!

-पतीच्या चौकशीमुळे चित्रा वाघ घाबरल्या होत्या- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या