बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर राग आहे”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाच्या मेळाव्यानिमित्त रविवारी उस्मानाबाद दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना मी 82 वर्षांचा झालो म्हणजे म्हातारा नाही झालो. मी कधीच थकणार नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. तर देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन वक्तव्यावरूनही पवारांनी टोला लगावला होता.

शरद पवारांच्या या वक्तव्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक झालो. एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात आणि दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगलमे छुरी घेऊन फिरतात, असा घणाघात पडळकरांनी केला.

शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर राग यामुळे आहे कारण माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की, शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ खोत असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो यांना देवेंद्र फडणवीसांनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणलं. त्यामुळेच या महाराष्ट्रातील प्रस्थापितांचा तीळपापड होत आहे, अशी खोचक टीका पडळकरांनी केली आहे.

दरम्यान, फडणवीसांनी आम्हाला सत्तेच्या प्रवाहात पुढे आणलं म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत खुपतात. पुन्हा येऊ देणार नाही म्हणता पण पक्ष स्थापनेपासून गेल्या तीस वर्षात तुम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज्यपालांना इथून हटवणं एका मिनिटाचं काम आहे”

मोठी बातमी! मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज

“निकाला आधीच मी येणार, मी येणार सांगत होते, पण आम्ही काय येऊ देतो”

“हिंदूह्रदयसम्राटाची पदवी बाळासाहेबांनंतर देवेंद्र फडणवीसांना देण्यात यावी”

नारायण राणेंच्या अडचणीत वाढ! ‘त्या’ प्रकरणी मुंबई महापालिकेनं 7 दिवसात उत्तर मागवलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More