बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवार आज सत्तेत आहेत उद्या नसतील, पण फडणवीस सत्तेत आल्यावर…”

पुणे | भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आणखी एकदा निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरोधात काढलेल्या जनआक्रोश मोर्चात बोलताना पडळकरांनी तुफान टोलेबाजी केली आहे.

पाहुण्यांना दुसऱ्या रस्त्याने घेऊन जात बारामतीचा विकास झाला असल्याचा घणाघात पडळकरांनी केला आहे. शरद पवारांनी जाणीवपूर्वक बारामती तालुक्यातील काही गावांना जाणीवपूर्वक पाणी दिलं नसल्याचा आरोप देखील गोपीचंद पडळकरांनी केला आहे.

बारामतीत या पवारांचे ऐकणारे राज्यात असे अनेक प्रांत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) आज सत्तेत आहेत, उद्या ते नसतील. उद्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सत्तेत आल्यावर तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही, असा खोचक टोला देखील गोपीचंद पडळकरांनी लगावला आहे.

दरम्यान, गोपीचंद पडळकरांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारला घेरण्याचं काम केलं आहे. शेतकऱ्यांचा वीजेचा प्रश्न, राज्यातील लोडशेडींग, ओबीसी आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवरून पडळकरांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत.

थोडक्यात बातम्या-

देशात मंकीपॉक्सची दहशत, केंद्र सरकारने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

“पाहुण्यांना दुसऱ्या रस्त्याने घेऊन जात बारामतीचा विकास झाला”

“…तर संभाजीराजे छत्रपतींना संजय राऊतांची सेफ जागा द्या”

नवनीत राणांचा मुंबई पोलिसांना थेट इशारा, म्हणाल्या…

संभाजीराजेंना पाठींबा देण्याबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More