काळजी घ्या! महाराष्ट्रात H3N2 व्हायरसच्या पहिल्या रूग्णाचा मृत्यू

मुंबई | कोरोना (Corona) महामारीनंतर एच 3एन 2 इन्फ्युएन्झा व्हायरसने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. देशभरात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पुण्यानंतर नागपुरातही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

एका खासगी रुग्णालयामध्ये एका 78 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेहासह इतर उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर नऊ जणांचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे अहवाल प्रलंबित आहे.

तरुण औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून मृत्यू झालेला तरुण नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता.

महत्त्वाच्या बातम्या-